गुरुवार, २७ जुलै, २०१७

पुण्यातील महिलांसाठीच्या मोबाईल स्वच्छतागृहांचा उद्देश काय ,प्रत्यक्ष वापर की फक्त जाहिरात ?

पुणे शहरात सध्या अनेक ठिकाणी महिलांसाठी मोबाईल स्वच्छतागृहे उभी केलेली दिसतात. पीएमपीएमएल च्या निकामी बसेसमध्ये काही बदल करून ती तयार करण्यात आलेली आहेत. चांगली रंगरंगोटी केली असल्याने ती आकर्षकही दिसतात. परंतु ती खरेच सुरू असतात का ?. औंध येथील आयटीआय रस्त्यावरील हे स्वच्छतागृह मागील अनेक दिवस बंद आहे. त्या बसखाली दारूच्या बाटल्याही स्पष्ट दिसत आहेत. सध्या वेगाने ‘स्मार्ट‘ होत चाललेल्या औंध , बाणेर , बालेवाडी भागात ही अवस्था असेल तर शहराच्या इतर भागात काय अवस्था असेल?



या चित्रातील मोबाईल स्वच्छतागृह औंधमधील आयटीय रस्त्यावरील क्रॉसवर्डच्या समोर आहे.काल ’आज तक’ चित्रवाहिनीच्या पंकज खेळकर यांना बाईट देण्यासाठी गेलो असता ते बंद असल्याचे उघड झाले. मी योगायोगाने त्याच भागात असल्याने क्रॉसवर्डच्या समोरील सिंध सोसायटीच्या गेटवर भेटण्याचे ठरले. त्यावेळी खेळकर यांनी अगदी सहजच सोसायटीच्या वॉचमनला ’रोज किती लोक हे टॉयलेट वापरतात ?’ असे विचारले.त्यावेळी मागील अनेक दिवस ते बंद असल्याचे उघडकीस आले. 


पुणे शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे. महिलांसाठी तर ती जवळपास नाहीतच.त्यावर उपाय म्हणून पुणे माहनगरपालिकेने ‘ती‘ या नावाने मोबाईल महिला स्वच्छतागृहांची योजना राबवली. व्यावसाईक सामाजिक जबाबदारी ( कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत शहरातील अनेक भागात ही स्वच्छतागृहे उभी करण्यात आली आहेत. या स्वच्छतागृहांबाबत फार माहिती मराठीतून उपलब्ध नसली तरी इंग्रजी भाषेत TI TOILET INTEGRATION या नावाखाली थोडीफार माहिती उपलब्ध आहे. मूळातच मराठी भाषेचा आणि स्मार्टनेसचा संबध काय ? असाच समज स्मार्ट सिटी योजना राबवणा-यांचा असावा. त्यामूळे स्मार्ट सिटीशी संबधीत सर्व व्यवहार, कंपन्या आणि एनजीओ ( हो एनजीओच कारण त्यांना सामाजिक संस्था म्हटलं कि डाउनमार्केट वाटतं) यांचा कारभार इंग्रजीतूनच चालतो. असो !



ही स्वच्छतागृहे आतून म्हणे अत्याधुनिक आहेत. त्यात पाश्चात्य आणि भारतीय पद्धतीचे शौचालय,स्नानकक्ष , हात धुवायचे भांडे, पाण्याची बचत करण्यासाठी आपात्कालीन मदतीसाठी बटन, संवेदक नळ (सेन्सर टॅप्स ) , पाण्याचे प्रवाह नियंत्रीत करणारे यंत्र. सौर उर्जेवरील वीज, स्वच्छता करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी इत्यादी सुविधा उपलब्ध असतात असे म्हटले जाते. असतीलही, इंटरनेटवर एवढी माहिती उपलब्ध आहे म्हटल्यानंतर प्रत्यक्षात स्वच्छतागृहात ती असणार यात शंकाच नाही.परंतु ती बंद का आहेत ?. या स्वच्छतागृहांचा उद्देश काय आहे प्रत्यक्ष वापर की फक्त जाहिरात ?



Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     – kvijay14@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा